नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी आहेर  | पुढारी

नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी आहेर 

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा 

देवळा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपाचे योगेश (नानू) दिनकर आहेर व हितेश प्रकाश आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज बुधवार (दि. १५) सकाळी १२ वाजता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी नगरपंचायत सभागृहात पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे योगेश दिनकर आहेर व हितेश प्रकाश आहेर यांचा निर्धारित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली.

त्यांना मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी सहाय्य केले. यावेळी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवकांचा नगराध्यक्षा सुलभा आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक संतोष आहेर, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक जितेंद्र आहेर, गटनेते संजय आहेर आदींसह मनोज आहेर ऐश्वर्या आहेर, भूषण गांगुर्डे, अश्विनी चौधरी, शिला आहेर, कैलास पवार, राखी भिलोरे, करण आहेर, भाग्यश्री पवार, रत्ना मेतकर, सुनंदा आहेर, संतोष शिंदे उपस्थित होते.

स्वीकृत नगरसेवक योगेश आहेर व हितेश आहेर यांचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाऊसाहेब पगार, अतुल पवार, किशोर चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा घोषणा होताच समर्थकांनी पाच कंदिलवर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले.

हेही वाचा : 

Back to top button