Javed Khan Aamrohi : अभिनेते जावेद खान अमरोही यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन | पुढारी

Javed Khan Aamrohi : अभिनेते जावेद खान अमरोही यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन झाले. ते फक्त ५० वर्षांचे होते. त्यांनी जवळपास १५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते दीर्घकाळापासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते आणि गेल्या एक वर्षापासून अंथरुणाला खिळले होते. त्यांना उपचारासाठी सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले हाते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Javed Khan Aamrohi)

जावेद खान अमरोही हे प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते होते. नुक्कडसारख्या मालिकांसाठी त्यांना ओळखले जाते. नुक्कडमधील यशानंतर त्यांना गुलजार यांच्या मिर्झा गालिबमध्ये फकीराची भूमिका करण्याची संधी मिळाली. दूरदर्शनच्या या दोन्ही टीव्ही मालिकांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप मदत केली. टीव्हीवर पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत. राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘वो सात दिन’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘नखुदा’, ‘प्रेमरोग’ इत्यादी चित्रपटांमध्येही ते छोट्या भूमिकांमध्ये दिसले होते. (Javed Khan Aamrohi)

जावेद खान अमरोही यांना २००१ मध्ये आलेल्या ‘लगान’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. याशिवाय ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे ​​इंडिया’मधील त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. जावेद खान यांनी एका इन्स्टिट्यूटमध्ये अॅक्टिंग फॅकल्टी म्हणूनही काम केले आहे. या अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांनी अनिल कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर, आमिर खान, गोविंदा, शाहरुख खान, अमिताभ बच्चन इत्यादींसोबत काम केले आहे आणि अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.

अधिक वाचा :

Back to top button