Gehana Vasisth : ‘राज कुंद्रा’च्या जुन्या पोर्नस्टार मैत्रिणी ‘या’ ठिकाणी पुन्हा भेटणार | पुढारी

Gehana Vasisth : ‘राज कुंद्रा’च्या जुन्या पोर्नस्टार मैत्रिणी ‘या’ ठिकाणी पुन्हा भेटणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठ आता तिच्या ‘बी बोल्ड विथ गेहना’ या शोद्वारे पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित लोकांच्या आयुष्यात डोकावणार आहे. या शोचा मुख्य उद्देश राज कुंद्रा आणि त्याच्या कथित पॉर्न साइट हॉटशॉट्स अॅपशी संबंधित रहस्ये उघडणे आहे. याशिवाय तिच्या ‘सेक्स टॉक विथ गेहाना’ या चॅट शोच्या माध्यमातून गेहना वशिष्ठ पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित कलाकारांचे अनुभव देखील शेअर करणार आहे. तसेच या पॉर्न इंडस्ट्रीत येण्यामागे तिचा हेतू काय होता हे देखिल ती या शोच्या माध्यातून उघड करणार आहे. (Gehana Vasisth)

अभिनेत्री गेहना वशिष्ठ सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असते. गेहना वशिष्ठलाही पॉर्न फिल्मच्या शूटिंगदरम्यान झालेल्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली होती. गेहना वशिष्ठ आता तिच्या ‘बी बोल्ड विथ गेहना’ या शोमध्ये पॉर्न फिल्म्सप्रकरणी अटक झालेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याचे रहस्य उलगडणार आहे. या शोमध्ये ती राज कुंद्रासोबत काम केलेल्या भारतीय पोर्न स्टार्सच्या मुलाखतही घेताना दिसणार आहे. गेहना वशिष्ठला 6 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ शूट करण्याच्या आणि वेबसाइटवर अपलोड करण्याप्रकरणी अटक केली होती. (Gehana Vasisth)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सेक्स टॉक विथ गेहना’ या चॅट शोसाठी खुशी मुखर्जी, आयुषी भौमिक, राजसी वर्मा, शरण्य जीत कौर, सपना ठाकूर, आयुषी जैस्वाल, पिहू शर्मा आणि अडल्ट OTT च्या जगाशी संबंधित अनेक कलाकार देखील सहभागी होणार आहेत. गोळी घातली. वंदना तिवारी हे गेहना वशिष्ठचे खरे नाव असून ती छत्तीसगडमधील चिरमिरीची रहिवासी आहे. टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी मिळवल्यानंतर गेहना वशिष्ठने बॉलिवूडमध्ये ‘प्यार में ऐसा होता है’, ‘फिल्मी दुनिया’, ‘लखनौई इश्क’ सारख्या कमी बजेटच्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Gehana Vasisth)

बॉलीवूडमध्ये यश न मिळाल्याने गेहना वशिष्ठने साऊथच्या इंडस्ट्रीकडे मोर्चा वळवला. दक्षिणेत तेलगू भाषेतील ‘ऑपरेशन दुर्योधन 2’, ‘बीटेक लव्ह स्टोरी’ या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर एकता कपूरच्या अल्ट बालाजीच्या मालिका ‘गंदी बात सीझन 3’ मधून तिला पॉर्न स्टार म्हणून ओळख मिळाली.

अधिक वाचा :

Back to top button