धक्कादायक! बहिणीनेच केला बहिणीचा विनयभंग, पुण्यातील घटना | पुढारी

धक्कादायक! बहिणीनेच केला बहिणीचा विनयभंग, पुण्यातील घटना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्यात सख्या बहिणीनेने आपल्या लहान बहिणीशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोठ्या बहिणीवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात एका 18 वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून 24 वर्षीय मोठ्या बहीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय तरूणी आणि 24 वर्षीय आरोपी या दोघी बहीणी असून त्या दोघी एकत्र विमाननगर परिसरातील एका रो हाऊसमध्ये राहतात. अठरा वर्षाची बहीण 23 जानेवारी रोजी हॉलमध्ये झोपली असताना मोठी बहीण असलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लिल चाळे केले. तरूणीला हा प्रकार चुकीचा वाटल्याने तिने पोलिस ठाण्यात धाव घेत मोठ्या बहिणी विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी ही सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तर संशयीत आरोपी असलेल्या बहीणीचे लग्न झाले असून तीचे देखील पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. ती वडीलांकडेच राहते. मोठ्या बहिणीने गैरप्रकार केल्याबाबत लहान बहिण पोलिस ठाण्यात आली होती. तिने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– विलास सोंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे.

Back to top button