Smart watch : ‘स्मार्टवॉच’ने वाचवला जीव! | पुढारी

Smart watch : ‘स्मार्टवॉच'ने वाचवला जीव!

लंडन : हल्ली स्मार्टफोन (Smart watch) जसे केवळ ‘फोन’चे काम न करता अनेक प्रकारची कामे करतात तसाच प्रकार घड्याळांचाही झालेला आहे. विशेषतः अशी स्मार्ट वॉच आरोग्यावरही लक्ष ठेवू शकतात व त्याचा आजपर्यंत अनेकांना अनेक प्रकारे लाभ झाल्याचे दिसून येते. ब्रिटनमधील एका महिलेनेही अशा घड्याळाने आपला जीव वाचवल्याचा दावा केला आहे.

ब्रिटनमध्ये राहणारी 59 वर्षांची इले थॉम्पसन या महिलेने आपल्या हातातील घड्याळाने (Smart watch) आपला जीव वाचवला, असा दावा केला आहे. इलेला 2018 साली सिझर आला होता. त्यावर उपचार झाले आणि त्यानंतरचे रिपोर्टही नॉर्मल आले. पण तरी तिला काही ना काही त्रास होत होता. तेव्हा 2022 साली तिच्या मुलीने तिला स्मार्ट वॉच वापरण्याचा सल्ला दिला. यानंतर एक दिवस या घड्याळाने अलर्ट दिला. तशी इलेने तत्काळ डॉक्टरांकडे धाव धेतली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, पण तिचे रिपोर्ट नॉर्मल होते. तेव्हा त्यांनी तिला हार्ट मॉनिटर दिले, ज्यावर एक आठवडा तिला हृदयावर लक्ष ठेवण्यास सांगितले.

जानेवरी 2023 साली या हार्ट मॉनिटरने अलर्ट दिला.  (Smart watch) तिच्या मेंदूत काही हालचाल होत नव्हती. हृदयाचे ठोकेही 19 सेकंदांसाठी थांबले होते. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तिला ती झोपेत 19 सेकंद मृतावस्थेतच गेल्याचं सांगितले. तिच्या हृदयाची धडकण्याची गती कमी झाली होती. तिच्या हृदयामध्ये ब्लॉकेज होते आणि तिला लगेच पेसमेकरची गरज असल्याचे सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button