New Delhi : ३ महिने अलिशान हॉटेलमध्ये राहिला अन् २४ लाखांचे बिल न भरता झाला फरार

New Delhi : ३ महिने अलिशान हॉटेलमध्ये राहिला अन् २४ लाखांचे बिल न भरता झाला फरार
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. (New Delhi) दिल्लीतील लीला पॅलेस या आलिशान हॉटेलमध्ये ३ महिने राहिल्यानंतर एक तरुण पैसे न देता फरार झाला. या तरुणाने तीन महिने हॉटेलमध्ये राहिला होता. यानंतर तो हॉटेलमधून गायब झाला. बनावट ओळखपत्राच्या आधारावर हा तरुण अनेक दिवस हॉटेलमध्ये थांबला होता. माहिती देताना हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले की, पैसे न देता हॉटेलमधून पळून गेलेल्या तरुणावर सुमारे २४ लाख रुपयांचे बिल थकित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बाब मागील वर्षातील आहे. बनावट ओळखपत्राच्या आधारे हा तरूण १ ऑगस्ट ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हॉटेलमध्ये थांबला होता. आरोपीच्या बनावट ओळखपत्रावर मोहम्मद शरीफ असे नाव नोंदवले आहे. २० नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री कोणालाही न सांगता तरुण हॉटेलमधून पळून गेला. यावेळी त्याने हॉटेलमध्ये असलेल्या चांदीच्या भांड्यांसह अनेक मौल्यवान वस्तू सोबत चोरून नेल्या. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने शनिवारी तक्रार दाखल केली आहे. (New Delhi)

हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले की, शरीफ याने हॉटेलमधील सर्वांना तो यूएईमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. तेथे असताना, तो अबू धाबीमधील राजघराण्याकरिता काम करतो. त्याने सांगितले की, बिन झायेद अल नहयानच्या कार्यालयात काम करतो. यासोबतच त्याने बनावट बिझनेस कार्ड, यूएईचे रहिवासी कार्ड आणि इतर कागदपत्रेही दाखवली होती. आरोपी तीन महिने हॉटेलच्या ४२७ क्रमांकाच्या खोलीत राहिला. तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यांना याबाबत काहीही मिळाले नाही.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news