मोरगाव-पळशी रस्त्यावर पुलाचे काम धोकादायक | पुढारी

मोरगाव-पळशी रस्त्यावर पुलाचे काम धोकादायक

मोरगाव; पुढारी वृत्तसेवा : मोरगाव-पळशी रस्त्यावर पुलाचे काम धोकादायकरीत्या तसेच दिरंगाईने सुरू असल्याने ते नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, यामुळे अपघाताचा धोका आहे. पळशीनजीक पुलाचे कामासाठी खड्डा खोदलेला असून बाजूने रहदारीसाठी रस्ता तयार केलेला आहे. या ठिकाणी रस्त्याला सुरक्षा गार्ड, दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताची शक्यता आहे, अशी चिंता बारामती भाजपाचे सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी मोरगाव-निरा रस्त्यावर चौधरवाडीच्या पुलाच्या खड्ड्यात पडून दुचाकी चालकाला जीव गमवावा लागला होता, त्याची पुनरावृत्ती होणार असे निदर्शनास आले आहे. संबंधित ठेकेदाराने जबाबदारीने संरक्षणविषयक बाबी पूर्ण कराव्यात. नागरिकांना संकटात टाकू नये. या ठिकाणी दिशादर्शक फलक, वाहनांसाठी मार्गदर्शक पांढरा चुना इत्यादीच्या सूचना जाण्या- येण्यासाठी योग्य रस्ता, सेवा रस्तेचा उल्लेख योग्य पद्धतीने नाही, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

या पुलावरून शनिवार (दि. 6) रात्री 8.30 वाजता आप्पासाहेब बुवासाहेब बरकडे. साधना गुलदगड व त्यांचे पती आप्पा बंडगर हे दोघे पळशीकडे जाताना समोरील खड्डा लक्षात न आल्याने ते खड्ड्यात अपघातग्रस्त होता होता वाचले. तरी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे या कामाकडे दुर्लक्ष आहे, असे मत बालगुडे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत हलगर्जीपणाबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

Back to top button