Rishabh Pant : अभिनेते अनुपम खेर, अनिल कपूर ऋषभ पंतच्या भेटीला | पुढारी

Rishabh Pant : अभिनेते अनुपम खेर, अनिल कपूर ऋषभ पंतच्या भेटीला

उत्तराखंड : पुढारी ऑनलाईन डेस्क – अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या तब्येतीची विचारपूस केली. शुक्रवार रोजीच्या अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतवर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात जाऊन अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी भेट घेतली. दोन्हीही अभिनेते म्हणाले की, आम्ही त्याला (Rishabh Pant) आणि त्याच्या आईला भेटलो. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. (Rishabh Pant ) दोघांनीही तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करा, असे म्हटले.

Back to top button