पुणे : 22 लाख टन साखरेचा कोटा खुला | पुढारी

पुणे : 22 लाख टन साखरेचा कोटा खुला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने जानेवारीसाठी 22 लाख टनांचा साखरेचा कोटा खुला केलेला आहे. मागणीच्या तुलनेत मुबलक कोटा असून, साखरेचे दर स्थिरावण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात आला. बाजारात डिसेंबर महिन्यात यात्रा, जत्रा, ख्रिसमसच्या सणामुळे मागणी चांगली राहिली.

मात्र, ही मागणी संपताच साखरेच्या दरात क्विंंटलमागे 50 ते 60 रुपयांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर 3475 ते 3500 रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जानेवारीत राहणारी मागणी आणि निविदांमध्ये साखरेचे दर कायम राहणार यावर पुढील तेजी-मंदी अवलंबून राहील, असे सांगण्यात आले.

Back to top button