अग्निवीर अंतर्गत निवड झालेल्या युवकांचे प्रशिक्षण बेळगावमध्ये (VIDEO) | पुढारी

अग्निवीर अंतर्गत निवड झालेल्या युवकांचे प्रशिक्षण बेळगावमध्ये (VIDEO)

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा: भारतामध्ये अग्निवीर अंतर्गत वायुसेनेमध्ये भरती होण्यासाठी युवकांकडून दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी २८५० युवकांची निवड झाली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम बेळगाव येथील सांबरा विमानतळावर सुरू झाले आहे.

देशातील सर्वात जुने प्रशिक्षण केंद्र म्हणून सांबरा विमान प्रशिक्षण केंद्राची ओळख आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची सोय आहे. चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर देशाला प्रामाणिक आणि शिस्तीचे युवक विविध क्षेत्रात मिळणार आहे, अशी माहिती वायुसेना प्रशिक्षण मुख्य अधिकारी मानवेंद्र सिंह यांनी शुक्रवारी (दि.३०) पत्रकारांना दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button