Honey Trap : मराठवाड्यातील तरुण साहित्यिकाची हनीट्रॅपद्वारे फसवणूक | पुढारी

Honey Trap : मराठवाड्यातील तरुण साहित्यिकाची हनीट्रॅपद्वारे फसवणूक

केज; पुढारी वृत्तसेवा : व्हाट्सअ‍ॅपवर डेटिंग आणि फसवणुकीच्या अनेक घटना पहायला मिळतात. अनेक तरुण तरुणी या घटनांना बळी पडल्याचे उदाहरणे आहेत. सध्या एक असेच काहीसे प्रकरण बीड जिल्ह्यात घडले आहे. अशीच एक घटना एका साहित्यिक तरुणाबाबत घडली आहे. महिलेसोबत व्हाट्सअ‍ॅपवर बोलणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. (Honey Trap)

एका साहित्यिक तरुण व्हाट्सअ‍ॅपवर एका अनोळखी महिलेसोबत चॅटिंग करीत असताना कामुक आणि अश्लील मेसेजला प्रतिसाद देण्याच्या आहारी गेला. ती सांगेल त्या गोष्टी तो करु लागला. ती अनोळखी महिला व्हिडीओ कॉल करून एकमेकांप्रती अश्लिल हावभाव करत होते. मात्र काही दिवसांनंतर त्याचे हे सर्व व्हीडिओ रेकॉर्डिंग करून आरोपी महिला व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. या धमकीमध्ये तिने त्याला ३१ हजार रुपयांची मागणी करत एका बॅँक खात्यात रक्कम पाठविण्यास सांगितले. (Honey Trap)

या घटनेतील पीडित तरुण हा केज येथील साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेला ग्रामीण कथाकार, कवी आणि लेखक आहे. पीडित तरुणाने मित्राद्वारे १२ हजार रुपयांची जमवाजमव केली आणि महिलेला थोडी रक्कम दिली. मात्र महिलेने उर्वरित रकमेसाठी पुन्हा वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी पीडित साहित्यिकाने याची पोलिसांत तक्रार दिली. (Honey Trap)

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची भेट घेऊन त्याने हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी साहित्यिकाला धीर देवून कायदेशीर बाबींची माहिती दिली. त्या नंतर या घटनेची बीड सायबर पोलीस ठाण्यात देखील तक्रार करण्यात आली आहे. (Honey Trap)

हेही वाचा

Back to top button