बीड : यात्रेहून येणाऱ्या युवकांच्या दुचाकीला उडवले; एकाचा जागीच मृत्यू | पुढारी

बीड : यात्रेहून येणाऱ्या युवकांच्या दुचाकीला उडवले; एकाचा जागीच मृत्यू

बीड ; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई – माळेगाव यात्रा करून परत निघालेल्या घाटनांदूर (ता.अंबाजोगाई) युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक युवक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात उजनी पाटी (ता.अंबाजोगाई) येथे काल (रविवार) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

घाटनांदूर येथील पांडुरंग हैबत वैद्य (वय १७) आणि श्रीकांत वामन मिसाळ (वय १७) हे दोघे यात्रेनिमित्त माळेगावला गेले होते. यात्रा आटोपून ते रविवारी सायंकाळी घाटनांदूरला माघारी निघाले होते. ते उजनी पाटीजवळ आले असता, अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पांडुरंग वैद्य याचा मृत्यू झाला, तर श्रीकांत मिसाळ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

अंबाजोगाई – माळेगाव यात्रा करून परत निघालेल्या घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक युवक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात उजनी पाटी (ता. अंबाजोगाई) येथे काल (रविवार) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

घाटनांदूर येथील पांडुरंग हैबत वैद्य (वय १७) आणि श्रीकांत वामन मिसाळ (वय १७) हे दोघे यात्रेनिमित्त माळेगावला गेले होते. यात्रा आटोपून ते रविवारी सायंकाळी घाटनांदूरला माघारी निघाले होते. ते उजनी पाटीजवळ आले असता, अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पांडुरंग वैद्य याचा मृत्यू झाला, तर श्रीकांत मिसाळ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button