पुणे: गावठाणापासून 200 मीटर आतील जमीन अकृषिक करून घ्या, अधिकार्‍यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना | पुढारी

पुणे: गावठाणापासून 200 मीटर आतील जमीन अकृषिक करून घ्या, अधिकार्‍यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गावाच्या गावठाण पासून 200 मीटरच्या परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनकरिता वाटप केलेल्या क्षेत्रातील कोणतीही जमीन देय रक्कम शासनजमा करून जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

आवश्यक रक्कम जमा केल्यानंतर जमीन अकृषिक करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी ही प्रक्रिया मोहीम स्तरावर राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना या क्षेत्रात घर बांधणे किंवा इतर प्रयोजनासाठी नियमानुसार जमिनीचा उपयोग करणे शक्य होणार आहे. जमीन अकृषिक करण्यासाठी इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याची देखील आवश्यकता असणार नाही.

भोगवटादाराने रक्कम भरल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या कालावधीत विहीत केलेल्या नमुन्यात सनद देण्यात येईल व त्यानुसार सदरची जमीन अकृषिक झाल्याचे समजण्यात येईल. या योजनेचा लाभ अधिकाधिक जमीन धारक व मिळकतधारकांनी घ्यावा आणि तहसिलदारांकडे अर्ज करून जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

जमीन भोगवटादार वर्ग-2 धाराची असल्यास अशा जमिनीच्या मानीय अकृषिक रूपांतरणापोटी देय नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणी भरून सदरची जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतूदीनुसार अकृषिक वापरात रूपांतरीत झाल्याचे समजण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले

Back to top button