नगर : जुनी पेन्शन नाकारणार्‍या राज्य सरकारचा निषेध | पुढारी

नगर : जुनी पेन्शन नाकारणार्‍या राज्य सरकारचा निषेध

नगर : पुढारी वृत्तसेवा  : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षक, शिक्षकेतरांना जुनी पेन्शन नाकारणार्‍या राज्य सरकारचा नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. या मागणीचा फेरविचार करण्याची मागणी केली. जुनी पेन्शन योजना सुरू करा, या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, चांगदेव कडू, उद्धव गुंड, अमोल ठाणगे, संभाजी गाडे, बंडू भांडवलकर, दीपक दरेकर, प्रशांत होन, भाऊसाहेब जिवडे, प्रदीप कोरडे, रमाकांत दरेकर, अवधूत आहेर, बी.एस. बिडवे, सुभाष भागवत, बाळासाहेब मेहेत्रे, अशोक कांंडके, शंकर कटारे हे शिक्षक उपस्थित होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिक्षकांचे जुनी पेन्शनसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास माध्यमिक शिक्षक संघटनेचा पाठिंबा असून, राज्य सरकारने जुन्या पेन्शनबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Back to top button