Benefits Of Carrots : गाजर खाल्ल्यास 'हे' आहेत सर्वोत्तम फायदे | पुढारी

Benefits Of Carrots : गाजर खाल्ल्यास 'हे' आहेत सर्वोत्तम फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाजर (Benefits Of Carrots) उपयोग डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. डोळ्यांचे प्राॅब्लेम सोडविण्यासाठी गाजर खाणे खूपच चांगले आहे. कारण, त्यात व्हिटॅमीन-अ असते. आपल्या रोजच्या आहारात गाजर सामील करून घेतले की, आपल्या डोळ्यांचे आजार बरे होतात. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये गाजराचा उपयोग आपण करू शकतो. गाजर शुगरच्या रग्णांना गाजराचा ज्यूस अत्यंत लाभदायी आहे.

Carrots

 

डोळ्यांचा निरोगी आरोग्य ः ‘अ’ जीवनसत्व गाजरात असते. त्यामुळे हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांसाठी महत्वाचे ठरते. डोळ्यांच्या विविध रोगांपासून गाजर आपल्याला राखू शकते. मात्र, गाजराचा ज्यूस जास्त घेऊ नये.

शुगर नियंत्रित करणे ः गाजरामध्ये जीआय स्कोर कमी असतो. त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये महत्वाची भूमिका गाजर पार पाडतो. जर तुम्हाला डायबिटिज आहे, गाजराच्या पदार्थांना आपल्या आहारात सामील करून घेऊ शकता. रक्त शर्करेसाठी माध्यम स्वरुपात गाजराचा रस पिऊ शकता.

त्वचेसाठी उपयुक्त ः गाजरामध्ये असणार जीवनसत्व-अ आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त आहे. गाजराच्या ज्यूसमध्ये एंटीऑक्सिडेंट असते आणि ते तुमच्या त्वचेतील फ्री रेडिकल्सपासूनदेखील तुम्हाला वाचवू शकते.

Carrots

हृदयविकारावर उपाय ः गाजराचा (Benefits Of Carrots) रस हृदय निरोगी राहण्यात मदत करते. गाजराच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम असते जे तुमच्या रक्तदाबात नियंत्रणात ठेवते. गाजरामध्ये असणारे एंटीऑक्सिडेंट ऑक्सिडेवीट तणावावर खूप लाभदायक आहे.

वजन कमी ः गाजरामध्ये फायबर असते, त्यामुळे तुम्हाला नेहमी टवटवीत राहण्यास मदत करते. गाजराच्या रसात कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन घटविण्यासाठी गाजर उपयुक्त आहे. तुम्ही जर गाजराचा रस तयार करू शकत असला तर, गाजर हिवाळ्यांच्या दिवसात मिळू शकतात. गाजराचा ज्यूस तयार करताना त्यामध्ये बीट, धने किंवा आवळा टाकू शकता.

पहा व्हिडीओ : मासिक पाळी दरम्यानच्या दुखण्याला करा दूरकरा नियमित योगासनं  

Back to top button