INDvsBAN 2nd Test : उमेश-अश्विनपुढे बांगला देश गारद, पहिला डाव 227 धावांत गुंडाळला | पुढारी

INDvsBAN 2nd Test : उमेश-अश्विनपुढे बांगला देश गारद, पहिला डाव 227 धावांत गुंडाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 227 धावांवर बाद झाला. बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय संघाच्या एकही फलंदाज चमकदार खेळी करू शकला नाही. 26 धावा करणारा मुशफिकुर रहीम संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. जयदेव उनाडकटने दोन गडी बाद केले. अश्विनने खालेद अहमदला उनाडकटकडे झेलबाद करून बांगलादेशचा डाव संपवला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 19 धावा केल्या. कर्णधार केएल राहुल (3*) आणि शुभमन गिल (14*) क्रीजवर आहेत.

पहिल्या डावात काय घडले?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने चांगली सुरुवात केली आणि नझमुल हसन आणि झाकीर यांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. 12 वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने झाकीर हसनला लोकेश राहुल करवी झेलबाद केले. तीन चेंडूंनंतर अश्विनने शांतोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोमिनुल आणि कर्णधार शकीबने तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. उमेशने शाकिबला बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला.

मोमिनुल एक टोक सांभाळत संयमी फलंदाजी करत राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत होत्या. बांगलादेशकडून मोमिनुलने सर्वाधिक 84 धावा केल्या. 26 धावा करणारा मुशफिकुर रहीम संघाचा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. लिटन दासने 25 आणि शांतोने 24 धावा केल्या. भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी चार विकेट घेतल्या. त्याचवेळी जयदेव उनाडकटने दोन गडी बाद केले.

पहिले सत्र : 82 धावा करताना यजमानांच्या 2 विकेट पडल्या

पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संमिश्र झाले. यामध्ये बांगलादेशी संघाने 82 धावा जोडल्या तर भारतीय संघाच्या गोलंदाजांनी 2 बळी घेतले. एका क्षणी बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर 39 धावांवर बाद झाले होते. पण, त्यानंतर कर्णधार शाकिब आणि मोमिनुल हकने डाव सांभाळला. सत्र संपेपर्यंत दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.

दुस-या सत्रात 102 धावा, 3 विकेट्स

दिवसाचे दुसरे सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. यामध्ये बांगलादेशने 102 धावा केल्या, पण तीन महत्त्वपूर्ण विकेट्सही गमावल्या. यादरम्यान, मोमिनुलने आपले 16 वे अर्धशतक झळकावून नाबाद राहिला. तर शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम आणि लिटन दास बाद झाले.

मोमिनुलने कसोटीत 27व्यांदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 9 शतकांचा समावेश आहे. त्याने बांगलादेशच्या हबीब-उल-बशर (27) च्या सर्वाधिक 50+ स्कोअरची बरोबरी केली. बांगलादेशसाठी तो चौथा सर्वाधिक 50+ धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्याआधी तमीम इक्बाल (41), शाकिब अल हसन (35) आणि मुशफिकर रहीम (34) यांचा क्रमांक लागतो.

IND vs BAN 2nd Test : उनाडकटचे १२ वर्षानंतर दमदार पदार्पण

१२ वर्षानंतर टीम इंडियामध्‍ये पदार्पण करणार्‍या जयदेव उनाडकटने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्‍याने १५ व्‍या षटकामध्‍ये बांगलादेशचा सलामीवीर झाकीर हसन याला झेलबाद केले. झाकीर याने ३४ चेंडूत १५ धावा केल्‍या. यानंतर दुसर्‍या म्‍हणजे १६ षटकात अश्‍विनने बांगलादेशला दुसरला धका दिला. त्‍याने सलामावीर शान्‍तोला पायचीत(लेग बिफोर विकेट) केले. तो २४ धावांवर बाद झाला.लंचब्रेकपर्यंत शाकिब १६ धावा तर मोनिकुल हक २३ धावांवर खेळत आहे.

भारताचे खराब क्षेत्ररक्षण

पहिल्‍या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रात भारताचे क्षेत्ररक्षण खराब झाले. दुसर्‍या षटकामध्‍ये मोहम्‍मद सिराज यांनी जाकिर हसन याचा झेल सोडला. तो पहिलाच चेंडू खळत होता. यानंतर मोमिनुक हक यालाही अश्‍विनच्‍या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. यष्‍टीरक्षक ऋषभ पंत आणि स्‍लीपमध्‍ये विराट कोहली यांच्‍यामधून चेंडू गेला. यानंतर ऋषभ पंत याने शाकिबला यष्‍टीचीत करण्‍याची संधीही गमावली.

भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश संघ : झाकीर हसन, नजमुल हसन शांतो, मोमिनुल हक, लिटन दास (विकेटकीपर), मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालेद अहमद आणि तस्किन अहमद.

Back to top button