Pune Gram Panchayat Live : रावणगाव : सरपंचासह लोणारवाडी भाजपच्या ताब्यात | पुढारी

Pune Gram Panchayat Live : रावणगाव : सरपंचासह लोणारवाडी भाजपच्या ताब्यात

रावणगाव (ता.दौंड); पुढारी वृत्तसेवा : लोणारवाडी  येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राहुल कुल समर्थक मुंजाबा ग्रामविकास पॅनलच्या प्रतीक्षा निलेश हिवरकर या २०६ मते मिळवत सरपंचपदी विजयी झाल्या कुल समर्थक मुंजाबा ग्रामविकास पॅनलने नऊ पैकी पाच जागा जिंकत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले माजी आमदार रमेश थोरात समर्थक मुंजाबा ग्रामपरिवर्तन पॅनलला चार जागा मिळाल्या पंचायतीत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे:

वार्ड क्र.१) तात्याबा भगवान हिवरकर (१६३),अनिल नामदेव पुणेकर (१४२), उज्वला अंबादास पुणेकर (१६०) सर्व विजयी उमेदवार

मुंजाबा ग्रामपरिवर्तन पॅनल
वार्ड क्र.२) दत्तात्रय शिवाजी वाळुंजकर (१८६), सिंधू विष्णू वाघ (१८६), जयश्री गोरख गाढवे (२०९) विजयी सर्व उमेदवार मुंजाबा

ग्रामविकास पॅनल
वार्ड क्र.३) गणेश नामदेव वाघ (२२१) (मुंजाबा ग्रामपरिवर्तन पॅनल), कोमल संदीप जाधव (२३३), पूजा महेश धगाटे (२५४) दोघेही मुंजाबा

ग्रामविकास पॅनल
सरपंचपदाच्या थेट लढतील मुंजाबा ग्रामविकास पॅनलच्या प्रतीक्षा निलेश हिवरकर ५६० मते मिळवत विक्रमी २०६ मतांनी विजयी झाल्या तर मुंजाबा ग्रामपरिवर्तन पॅनलच्या पराभूत संगीता मधुकर वाघ यांना ३५४ मते मिळाली त्या खालोखाल अपक्ष गौरी सुनील देवकाते यांनी (८९) मते मिळवली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रावणगाव मंडल अधिकारी मंगेश नेवसे यांनी कामकाज पाहिले

विजयी उमेदवारांचा जल्लोष

Back to top button