पराभवानंतर फ्रान्‍समध्‍ये चाहत्‍यांचा उद्रेक, अनेक शहरांमध्‍ये तोडफोड करत वाहनांची जाळपोळ | पुढारी

पराभवानंतर फ्रान्‍समध्‍ये चाहत्‍यांचा उद्रेक, अनेक शहरांमध्‍ये तोडफोड करत वाहनांची जाळपोळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात अर्जेंटिनाकडून पराभव झाल्‍यानंतर फ्रान्‍समधील अनेक शहरांमध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. हजारो चाहत्‍यांनी राजधानी पॅरीसमधील रस्‍त्‍यांवर उतरत तोडफोड करत वाहने पेटवून दिली. पॅरिससह अन्‍य शहरांमध्‍येही हिंसाचाराचा वणवा भडकला. परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्‍या कांड्या फोडाव्‍या लागल्‍या. पॅरीसमध्‍ये मोठ्या संख्‍येने पोलीस कर्मचारी तैनात करण्‍यात आले आहेत.

पॅरीस पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अंतिम सामना पाहण्‍यासाठी शहरातील अनेक चौकांमध्‍ये चाहते जमले होते. पराभवानंतर रस्‍त्‍यावर जमलेला जमाव हिंसक झाला. हिंसक जमावाने रस्‍त्‍यावरील वाहनांची तोडफोड करत काही वाहने पेटवून दिली. अचानक हिंसक झालेल्‍या जमावाला नियंत्रणात आणताना पोलिसांची एकच धावपळ उडली. पॅरीससह लेओन आणि नीसमध्‍येही हिंसाचाराच्‍या घटना घडल्‍या. हिंसाचार प्रकरणी अनेकांना अटक करण्‍यात आली आहे. जमावाला पांगविण्‍यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्‍या कांड्या फोडल्‍या.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button