धक्कादायक ! पुण्यात गाईचे पाय बांधून अनैसर्गिक कृत्य
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील हडपसर परिसरातून एक संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे. एका सोळा वर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केला. फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात 13 डिसेंबर च्या पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणाला हडपसर पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भादवी 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 28 वर्षीय तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे