पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. काटेवाडी ते संसद असा दिर्घ प्रवास केलेल्या पवारांवर वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. “श्री शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो.” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button