Weather Forecast : मंदौस चक्रीवादळामुळे राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत १२ ते १३ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता | पुढारी

Weather Forecast : मंदौस चक्रीवादळामुळे राज्यातील 'या' जिल्ह्यांत १२ ते १३ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे दक्षिण किनारपट्टीवरील तमिळनाडू, पाँडेचरी, केरळ राज्यासह महाराष्ट्रातही पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानंतर पुन्हा १२ ते १३ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांतही वादळी वारा आणि विजांच्या कडकडाट होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर पुढील 3 ते 4 दिवस काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

मंदौस म्हणजे तिजोरी हे नाव संयुक्त अरब राष्ट्राने दिलेले असून, ते ९ डिसेंबर रोजी पाँडिचेरी व श्रीहरीकोटा येथील मामल्लापूरमजवळ मध्यरात्री जमिनीवर येणार आहे. याची तीव्रता शुक्रवार ते रविवार (९ ते ११ डिसेंबर) अशी राहील. महाराष्ट्रावर ११ ते १४ डिसेंबरपर्यंत परिणाम राहील. हे चक्रीवादळ गोलाकार फिरत येत असून, वेग ताशी ७६ किलोमीटर इतका असणार आहे; अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button