तामिळनाडू, आंध्र किनार्‍यावर उद्या चक्रीवादळ धडकणार | पुढारी

तामिळनाडू, आंध्र किनार्‍यावर उद्या चक्रीवादळ धडकणार

चेन्नई :  बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले असून, ते भारतीय किनारपट्टीकडे सरकत आहे. 8 डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ धडकणार असून, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना या वादळाचा फटका बसणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निदर्शनास आले. याचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, त्याचे नाव ‘मंदौस’ ठेवण्यात आले आहे.

Back to top button