मुंबई: माणुसकीला काळिमा फासणारी घटना; महिलेला मारझोड करत चाकूच्या धाकावर केला बलात्कार | पुढारी

मुंबई: माणुसकीला काळिमा फासणारी घटना; महिलेला मारझोड करत चाकूच्या धाकावर केला बलात्कार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कुर्ल्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका ४२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तीन नराधमांनी तिच्यावर अमानुष अत्याचार करत चाकूच्या धाकावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि हत्यारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन कुर्ला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या बलात्कार प्रकरणामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

अमानुष पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती कुर्ला पश्चिम परिसरात रहाते. ३० नोव्हेंबरच्या पहाटे बबलू, वसीम आणि मुन्ना नावाचे तीन जण तिच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसले. मात्र, या तीन नराधमांच्या ताकदीपुढे तिचे काही चालू शकले नाही. या तिघांनी तिला जबर मारहाण केलीच, शिवाय त्यानंतर या तिघांनीही तिला विवस्त्र करत तीन नराधम पीडितेला शिविगाळ करत मारहाण आरोपींचे कृत्य क्रुरपणे आळीपाळीने बलात्कार आणि मारझोड करत चाकूच्या धाकावर बलात्कार तिचे हात पाय आणि तोंड बांधले. हे विकृत एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी माचिसच्या काड्या पेटवून त्या पीडितेच्या गुप्तांगावर टाकल्या. त्यानंतर या तिघांनीही चाकूच्या धाकावर पीडितेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. यातील एका आरोपीने पीडिता विव्हळत असताना त्याचे मोबाईलमध्ये शुटींगसूद्धा केले. तर, एका नराधमाने चाकूने तिच्या हातावर आणि छातीवर वार करुन तेथून पळ काढला..

त्यानंतर पीडित महिला उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल झाली आणि बलात्काराचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी बबलू, वसीम आणि मुत्रा या तिघांविरोधात भादंवि कलम ३७६, ३७६ (३), ३७७, ४५२, ३५४, ३२४, ५०९, ३२३, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात आहे.

Back to top button