‘WHO’ मंकी पॉक्सचे नाव बदलून ‘एम पॉक्स’ करणार! | पुढारी

'WHO' मंकी पॉक्सचे नाव बदलून 'एम पॉक्स' करणार!

पुढारी ऑनलाइन डेस्क : WHO मंकी पॉक्सचे नाव बदलून एम पॉक्स करण्याच्या विचारात आहे, असे वृत्त अमेरिकेतील एका वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे. आज बुधवारी WHO याबाबतचा निर्णय घेऊ शकते.

अहवालानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मंकी पॉक्सचे नाव बदलून एम पॉक्स करावे असे WHO ला सूचवण्यात आले होते, असे म्हटले आहे. विषाणूच्या नावामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन देशातील लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे, असेही या अवहवालात म्हटले आहे.

मे 2022 पासून ज्या देशांमध्ये हा रोग स्थानिक नाही अशा देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन डेटानुसार यूएसमध्ये जवळपास 30,000 संक्रमणांची नोंद झाली आहे.

मंकीपॉक्स विषाणुचा प्रसार प्रामुख्याने पश्चिम किंवा मध्य अफ्रिकेऐवजी युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये झाला आहे. मात्र, नंतरच्या काळात जगातील अन्यत्रही त्याचा प्रसार झाला आहे.

तसेच एका अहवालानुसार, मंकी पॉक्सची लागण प्रामुख्याने समलैंगिक संबंध ठेवणा-या पुरुषांमध्ये झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे देखिल याबाबत गैरसमज निर्माण होत आहे. यामुळे देखिल मंकी पॉक्स हे नाव बदलून एम पॉक्स हे नाव देण्याची तयारी WHO ने केली आहे, असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा :

Monkeypox in China : मंकीपॉक्‍सचा रुग्‍ण आढळल्‍यानंतर चीनच्‍या ‘त्‍या’ आदेशामुळे नवा वाद

Monkeypox : भारतातील पहिले स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच, संसर्ग लवकर ओळखण्यात होईल मदत

Back to top button