उत्तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील २४ तासात थंडीची लाट | पुढारी

उत्तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील २४ तासात थंडीची लाट

पुढारी ऑनलाईन: दिवसेंदिवस वातावरणातील थंडी वाढताना दिसत आहे. उत्तर, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये  पुढील २४ तासांत थंडीची लाट येणार, आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. संपूर्ण भारतात पुढच्या २४ तासात तापमानाचा पारा घसरणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

भारतातील उत्तरेकडील भाग, पश्चिम-उत्तर आणि मध्य भारतातील काही भागात कमीत कमी 10 °C पर्यंत तापमान घसरला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यावर्षीच्या ऋतुमधील ही निच्चांकी पातळी नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला भरणार हुडहुडी

देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भागांतील राज्यांबरोबर महाराष्ट्रातही कमी 10°C पेक्षाही कमी तापमानाची नोंद होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, जळगाव, नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमाणाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button