मुंबई : कर्नाक पूल तोडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्‍लॉक; ३६ मेल-एक्स्प्रेस रद्द, जाणून घ्या कोणते मार्ग बंद राहणार? | पुढारी

मुंबई : कर्नाक पूल तोडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्‍लॉक; ३६ मेल-एक्स्प्रेस रद्द, जाणून घ्या कोणते मार्ग बंद राहणार?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यानच्या १५४ वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिटिशकालिन कर्नाक उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील भाग पाडण्यासाठी 19 नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून रविवारी २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपर्यत २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान मेन लाईनवरील सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच अप आणि डाउन मार्गावरील ३६ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. यात मुंबई-पुणे मार्गांवरील इंटरसीटी, डेक्कन एक्स्प्रेस, सिहंगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीनचा समावेश आहे.

कर्नाक पुल धोकादायक असल्याने तो पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पुलाचे पाडकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरु केले आहे. नवीन पूल महापालिका उभारणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर मेल-एक्सप्रेसच्या तिकिटांचा परतावा देण्यासाठी रिफंड काउंटर उघडण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मदत कक्षही सुरु करण्यात येणार आहेत.

असा असणार ब्लॉक

  1. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान अप -डाउन धिम्या आणि जलद मार्गावर: शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी २० नोव्हेंबरपर्यत दुपारी ४ वाजेपर्यत (१७ तास)
  2. सीएसएमटी ते वडाळा दरम्यान अप – डाउन मार्गावर: शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी २० नोव्हेंबरला रात्री ८ वाजेपर्यत (२१ तास)
  3. सातवी मार्गिका आणि यार्ड: शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११वाजल्यापासून रविवारी २० नोव्हेंबरला रात्री २ वाजेपर्यत(२७ तास)

    ब्लॉकचा परिणाम

सीएसएमटी ते भायखळा, वडाळा दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. मुख्य मार्गावरील अप-डाउन लोकल भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांपर्यतच धावणार असून, तेथूनच चालविण्यात येतील. लोकलची संख्या कमी असेल. हार्बर लाईनवरील अप आणि डाउन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यत धावतील. रविवारी मेन लाईनवर एसी लोकल बंद असणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट जादा बस चालविण्यात येणार आहेत.

शनिवारी मेल-एक्सप्रेस रद्द

12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस,17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस ,12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस,12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस,17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस निजामाबाद मार्गे, 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस ,17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस ,12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ

रविवारी मेल-एक्सप्रेस रद्द

17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस ,12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस ,12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस ,12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ ,11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस ,02101 मुंबई – मनमाड विशेष ,12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे, 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस ,12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन ,12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस, 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ,12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस ,17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ,11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस ,12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन ,12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस , 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे, 02102 मनमाड – मुंबई स्पेशल , 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ,17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे, 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस, 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस,12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस,17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस

सोमवारी मेल-एक्सप्रेस रद्द

17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस ,12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ,11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस

शनिवारी दादर येथून सुटणार

22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस ,11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

रविवारी दादर येथून सुटणार

22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस ,12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस ,22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस,12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस ,12534 मुंबई – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस,12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस, 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस,11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस ,22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस ,22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस , 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस,12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस,12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल, 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस ,22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस, 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे,12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे , 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस , 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या

10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस (शनिवार),10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस,12133 मुंबई-मंगळुरु जं. एक्सप्रेस,10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस (रविवार)

रविवारी पुणे येथून सुटणार

11301 मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ,11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस ,16331 मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस,11139 मुंबई- गदग एक्सप्रेस , 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस

शनिवारी मुंबईत येणाऱ्या गाड्या दादरपर्यतच धावतील

22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस ,12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस ,11402 आदिलाबाद – मुंबई एक्स्प्रेस, 22158 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस,12106 गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस, 22144 बिदर – मुंबई एक्स्प्रेस,11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस, 12533 लखनौ जं. – मुंबई पुष्पक एक्सप्रेस ,12290 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, 22178 वाराणसी – मुंबई महानगरी एक्सप्रेस, 22222 ह. निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस, 22160 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस,22731 हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस, 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस

रविवारी मुंबईत येणाऱ्या गाड्या दादरपर्यतच धावतील

22120 करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस,12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.

पनवेल पर्यत येणाऱ्या गाड्या

10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस,12134 मंगळुरु जं. – मुंबई एक्सप्रेस, 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस ,10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस

हेही वाचा :  

Back to top button