Threat to Rahul Gandhi : राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मिठाई दुकानात सापडले पत्र | पुढारी

Threat to Rahul Gandhi : राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मिठाई दुकानात सापडले पत्र

पुढारी ऑनलाइन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत आहे. दरम्यान, इंदोरमध्ये एका मिठाईच्या दुकानात सापडलेल्या पत्रात राहुल गांधी (Threat to Rahul Gandhi) यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जुनी इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र सापडले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पत्र सोडून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, इंदोरच्या जुन्या भागात असलेल्या मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र (Threat to Rahul Gandhi) टाकले होते. हा प्रकार दुकान मालकाने पाहिल्यानंतर त्यांनी हे पत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. या पत्रात राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास बॉम्बने स्फोट घडवून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. डीसीपी रजत सकले यांनी धमकीचे पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धमकीचे हे पत्र उज्जैनमधून आल्याचे सांगितले जात आहे. या पत्रात एका आमदाराच्या नावाचाही उल्लेख आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. नुकतेच पंजाबच्या कीर्तनकाराने खालसा कॉलेजमधील प्रकाश पर्व कार्यक्रमादरम्यान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांना सन्मानित केल्याबद्दल टीका केली होती. यापुढे कधीही इंदोरला येणार नसल्याचेही सांगितले होते. यावरून बराच वाद झाला होता. आता राहुल गांधी यांना मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button