Mula Dam : मुळा धरणाचे ५ दरवाजे उघडले, नदी पात्रात विसर्ग सुरू | पुढारी

Mula Dam : मुळा धरणाचे ५ दरवाजे उघडले, नदी पात्रात विसर्ग सुरू

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : Mula Dam : मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने ११ पैकी ५ दरवाजे उघडण्यात आले. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला.

गत ३ दिवसापासून मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा संततधार सुरू आहे. परिणामी धरणाकडे विक्रमी २३ हजार क्यूसेकने आवक येत होती. त्यामुळे धरण साठ्यात २४ हजार दलघफू पाणीसाठा होताच धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे सांगण्यात आले.

धरण स्थळी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपस्थिती देत पूजन करीत मुळा माईची खना नारळाची ओटी भरली.

११ पैकी ५ दरवाजे उघडण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती पाहता पर्यटकांनी गर्दी करू नये व नदी पत्रालागतच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाचे शाखाभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी केले आहे.

Back to top button