वाकड चौकामध्ये सिग्नलशेजारी पाणीगळती | पुढारी

वाकड चौकामध्ये सिग्नलशेजारी पाणीगळती

वाकड : पुढारी वृत्तसेवा :  पाणीपुरवठा जलवाहिनी लिकेज झाली असून त्यामधून पाणी गळती होत आहे. वाकडमधील वाकड चौकात सिग्नल शेजारील पाणीपुरवठा वाहिनीमधून पाणी गळती होत आहे, याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक मागणी करत आहेत. पाईपलाईन मध्येच खराब झाल्यामुळे त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या खराब झालेल्या पाईपमधून येणारे पाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जमा होत असून त्याच्या शेजारी सिग्नल असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला साठलेले पाणी येणारे जाणारे लोकांच्या अंगावर पाणी उडण्याचे प्रकारे घडत असून त्यामुळे वारंवार वाद ही उद्भवत आहे.

पाण्याची पाईप लाईनमध्ये लिकेज झाल्यामुळे त्यामध्ये खराब पाणी मिक्स होण्याची शक्यता नाकारता येत नसून , पावसाळ्यामुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांना यामुळे खराब पाणी पिऊन गॅस्ट्रो सारख्या आजाराला आमंत्रण देण्यात येत आहे.
या साठलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास मदत होते आणि यामुळे वाहनचालकांना गाडी चालवतान मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे लोकांना चालणेही कठीण होऊन बसते आणि प्रसंगी वादही उद्भवतात.

त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाणी गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. या येणार्‍या खराब पाण्यामुळे पोटांचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही होणारी पाणीगळती लवकरात लवकर थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button