ICC Chairman Greg Barclay : आयसीसीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा ग्रेग बार्कले यांची निवड | पुढारी

ICC Chairman Greg Barclay : आयसीसीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा ग्रेग बार्कले यांची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी आज (दि.१२) एकमताने ग्रेग बार्कले  (ICC Chairman Greg Barclay) यांची फेरनिवड करण्यात आली. बार्कले दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्वतंत्र अध्यक्ष म्हणून पुन्हा काम पाहतील. झिम्बाब्वेच्या तवेंगवा मुकुहलानी यांनी माघार घेतल्याने बार्कले यांची बिनविरोध निवड झाली. ग्रेग बार्कले ऑकलंडमधील व्यावसायिक वकील आहेत. बार्कले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

बार्कले (ICC Chairman Greg Barclay)  म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. माझे सहकारी आयसीसी संचालकांनी मला समर्थन दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गेल्या दोन वर्षांत आम्ही आमच्या खेळासाठी यशस्वी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी स्पष्ट दिशा देणारी आमची जागतिक वाढ धोरण सुरू करून लक्षणीय प्रगती केली आहे. मी आमच्या सदस्यांसोबत जवळून काम करत राहण्यास उत्सुक आहे.

दरम्यान, बार्कले व्यावसायिक वकील असून नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची आयसीसी च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते पूर्वी न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष होते. तसेच आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2015 चे संचालक होते. जुलैमध्ये, बार्कले यांनी अध्य़क्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मुकुहलानी म्हणाले की, व्यावसायिक वकील असलेले बार्कले यांचे काम खेळाच्या सर्वोत्तम हितासाठी राहिले आहे. आयसीसीचे अध्यक्ष म्हणून ग्रेग यांची पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांचे नेतृत्व खेळाच्या हितासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button