Twitter Blue tick :ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शन सेवा तात्पुरती स्थगित; बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय | पुढारी

Twitter Blue tick :ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शन सेवा तात्पुरती स्थगित; बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क :  एलॉन मस्क ट्विटरचा पदभार घेतल्यानंतर ट्विटरमध्ये बरेच बदल केले आहेत. आता ट्विटर युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. एलॉन मस्कने गेल्या काही दिवसात ज्या ट्विटर युजर्सची ब्लु टिक आहे त्यांना ८ डॉलर मोजावे लागणार होते. ज्या युजर्सनी यापूर्वी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे. ट्विटरच्या बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा सध्या स्थगित करण्यात आले आहे.. वाचा सविस्तर बातमी. (Twitter Blue tick)
गेले काही दिवस ट्विटर आणि ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) खूप चर्चेत आहे. ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरबाबतीत एकापाठोपाठ एक निर्णय घेतले आहेत. त्यांनी आता आणखी एक निर्णय घेतला आहे. एका वृत्तवाहिनीनुसार आठ डॉलर भरून ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली होती. भारतात याचे व्हेरिफिकेशन देखिल सुरू झाले होते. मात्र, हा कार्यक्रम सध्यासाठी स्थगित केला आहे.  ही  सेवा सुरु झाल्यानंतर काही  युजर्सकडून या सेवेचा गैरवापर होत असल्याचा ट्विटरच्या लक्षात आले. ट्विटरची काही बनावट खाती जी व्हेरिफायड आहेत ते चुकीची, खोटी माहीती पसरवत असल्याच लक्षात आलं. याचा फटका अनेकांना बसला आहे. उदा. अमेरिकन व्यावसायिक बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स.

वेगाने वाढणारे बनावट खाते त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष गोष्ट अशी आहे की नवीन ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन ब्लू टिक्ससह येतात आणि सेलिब्रिटींना दिलेल्या ब्लू टिक्ससारखे दिसतात. वापरकर्त्याने फीड पाहिल्यास, नवीन टिक अगदी सारखीच दिसेल. जेव्हा वापरकर्ता बॅजवर क्लिक करतो तेव्हा फरक दिसून येतो. मग ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीला दिले गेले आहे किंवा पैसे देऊन घेतले गेले आहे हे लक्षात येते. जी बनावट खाती आहेत अशी अनेक खाती निलंबित करण्यात आली आहेत. जी बनावट पोस्ट्स सर्वत्र पसरत आहेत. पण गेल्या काही दिवसात ट्विटरने आपल्या काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याने ब्लु टिक सबस्क्रिप्शन पेमेंटच्या वेळी खात्यांची सत्यता तपासणे आणि बनावट वापराचा प्रसार रोखणे ट्विटरसाठी कठीण होत आहे.

माहितीनुसार, प्रमुख ब्रँड्सच्या नावावर बनावट वापरकर्त्यांची वाढती संख्या पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ज्या युजर्सनी यापूर्वी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे. ट्विटरच्या बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा सध्या स्थगित करण्यात आले आहे.

Back to top button