रायगड : पोलादपूरजवळ चोळई येथे भीषण अपघात, मोठ्या जीवित हानीची शक्यता  | पुढारी

रायगड : पोलादपूरजवळ चोळई येथे भीषण अपघात, मोठ्या जीवित हानीची शक्यता 

रायगड, पुढारी वृत्तसेवा : पोलादपूर नजीक चोळाई येथे डंपरखाली रिक्षा दाबली गेल्याने मोठा अपघात झाला. रिक्षावर डंपर पलटी झाल्याने ४ जण दगावल्याची शक्यता आहे. या रिक्षामध्ये किती प्रवासी होते? हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान जखमींना रूग्णालयात हलवण्यासाठी मदकार्य सुरू आहे. अपघाताची भीषणता लक्षात घेता मदतकार्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी आतापर्यंत सहा अपघात झाले असून या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button