रत्‍नागिरी : गणपतीपुळेतील रिसॉर्टच्या नावे फ्रॉड बुकिंग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

रत्‍नागिरी : गणपतीपुळेतील रिसॉर्टच्या नावे फ्रॉड बुकिंग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गणपतीपुळे येथील रिसॉर्टच्या नावाने बुकिंगसाठी 29 हजार रुपये स्वीकारून रिसॉर्ट आणि ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 12 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2022 या कालावधीत घडली आहे.

याबाबत गणपतीपुळे येथील हॉटेल ग्रीनलीफ द रिसॉर्ट अँड स्पामध्ये नोकरी करणारे पंकज अनिल नेमाडे (वय 25, मूळ रा.भुसावळ, जळगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,अज्ञाताने हॉटेलच्या नावाने गुगल मॅप सर्च इंजिनवरील बिझनेस लिस्टिंगमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर हॉटेलचा संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी बदलून त्याजागी स्वतःचा क्रमांक आणि ई-मेल आयडी टाकला. त्याद्वारे हॉटेलमद्ये येणाऱ्या ग्राहकांना रूम बुक करण्यासाठी भाग पाडून 29 हजार रुपये घेऊन हॉटेल आणि ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button