अब्जाधीश तृतियपंथी सुंदरी बनली Miss Universeची मालक | पुढारी

अब्जाधीश तृतियपंथी सुंदरी बनली Miss Universeची मालक

अब्जाधीश तृतितपंथी सुंदरी बनली Miss Universeची मालक

पुढारी ऑनलाईन  डेस्क – थायलंड येथील माध्यम सम्राज्ञी अॅनी जक्कापोग जक्राजुतापी यांनी Miss Universe ही सौंदर्य स्पर्धा विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी तब्बल २० दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास १६५ कोटी रुपये मोजले आहेत. अॅनी या तृतियपंथी असून तृतियपंथीं नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने काम केले आहे.

थायलंडमधील JKN Global Groupच्या त्या मालक आहेत. JNK Global Group ने बुधवारी ही घोषणा केली. Miss Universe स्पर्धेचा आशियात विस्तार करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

यानिमित्त Miss Universe ची मालकी प्रथमच एक तृतीयपंथी महिलेकडे गेली आहे. Miss Universe ही स्पर्धा १९५२पासून सुरू आहे. जगात सर्वाधिक पाहिली जाते.

सौदर्य स्पर्धा आणि वाद

सौंदर्य स्पर्धा सर्वसमावेश झाले पाहिजेत, अशी मोठी मागणी सातत्याने होत असते. तृतीयपंथींना या स्पर्धत भाग घेण्याची मुभा २०१२नंतर मिळाली. यापूर्वी २००४ला Miss International Queen ही तृतीयपंथींसाठीची सौंदर्य स्पर्धा २००४पासून सुरू आहे. तर भारतात २०१७पासून Miss Transqueen India ही स्पर्धा होते. Miss America या स्पर्धेत १९४०च्या दशकापर्यंत कृष्णवर्णीय महिलांना सहभाग घेता येत नव्हता.

हेही वाचा

Back to top button