#MISSUNIVERSE : ‘या’ उत्तरानं भारताची हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स!

#MISSUNIVERSE : ‘या’ उत्तरानं भारताची हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स!
Published on
Updated on

इलात ( इस्राइल) : पुढारी ऑनलाईन

#MISSUNIVERSE : भारताच्या २१ वर्षीय हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिने मिस युनिव्हर्स २०२१ (Miss Universe 2021) चा किताब जिंकला. ही स्पर्धा इस्राइलमधील इलात येथे पार पडली. याआधी १९९४ मध्ये भारताच्या सुश्मिता सेन आणि २००० मध्ये लारा दत्ता हिने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तब्बल २१ वर्षानंतर भारताच्या पंजाबमधील हरनाजनं मिस युनिव्हर्स मुकुटावर आपलं नाव कोरलं. तिने पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. हरनाजला २०२०ची मिस युनिव्हर्स मेक्सिकोची अँड्रिया मेझा (Andrea Meza) हिने मुकूट परिधान केला. या स्पर्धेत पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेची स्पर्धक अनुक्रमे फर्स्ट आणि सेकंट रनर्स अप ठरली.

पहिल्या टॉप तीन राउंडमध्ये स्पर्धकांना, 'आजच्या काळात येणाऱ्या दबावांना कसे सामोरे जायचे याबद्दल तरुण महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल', असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हरनाजने उत्तर दिले, "आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव आहे, तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. आपण अद्वितीय आहात हेच जाणून घेणे आपल्याला सुंदर बनवते. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा. पुढे येऊन स्वतःबद्दल बोला कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे लीडर आहात. तू तुझाच आवाज आहेस. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे." हरनाजने आत्मविश्वासाने दिलेल्या या उत्तराने तिने फायनल फेरीत धडक मारली.

टॉप ५ राउंडमध्ये हरनाजला, "अनेक लोकांना हवामान बदल ही लबाडी वाटते, याबद्दल तुम्ही त्यांना खरे काय हे पटवून देण्यासाठी काय कराल?" असा प्रश्न परीक्षकाने विचारला होता. त्यावर हरनाजने आत्मविश्वासाने उत्तर दिल्याने परीक्षक खूपच प्रभावित झाले. हरनाज म्हणाली, "निसर्ग खूप समस्यांमधून कसा जात आहे हे पाहून माझे मन व्यथित झाले आहे आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे झाले आहे. मला असे वाटते की आता कमी बोलून कृती करण्याची हीच वेळ आहे. कारण आपली प्रत्येक कृती निसर्गाला वाचवू शकते अथवा नष्टही करु शकते. पश्चात्ताप आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणे चांगले आहे आणि आज मी तुम्हाला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे." असे आत्मविश्वासाने उत्तर देऊन तिने परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या उत्तराने टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ती २०२१ची मिस युनिव्हर्स झाली.

#MISSUNIVERSE हरनाज विषयी…

मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या हरनाजने ऑक्टोबरमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया २०२१ चा किताब जिंकला होता. त्यानंतर तिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत तिने मिस युनिव्हर्सचा मुकूट परिधान केला. २१ वर्षीय हरनाज Public Administration या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने याआधी Femina Miss India Punjab 2019 ही स्पर्धा जिंकली आहे. तिने काही पंजाबी चित्रपटात काम केले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news