दीपोत्सव : उद्या दिवाळी पाडवा, जाणून घ्या मुहूर्त | पुढारी

दीपोत्सव : उद्या दिवाळी पाडवा, जाणून घ्या मुहूर्त

बुधवार, 26/10/2022 कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शक नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते, असे म्हटले जाते.

वहीपूजन मुहूर्त

(26 ऑक्टोबर) पहाटे 3:30 ते 6:30, सकाळी 6:30 ते 9:30, सकाळी 11:00 ते 12:30.

यमद्वितीया (भाऊबीज)

नरकचतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र, या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीजसुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. दिवाळी पाडव्याबरोबरच बुधवारी भाऊबीज आहे. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे.

– पंचांगकर्ते दात

Back to top button