मंगळावरचे जीवन एलियन्समुळेच नष्ट | पुढारी

मंगळावरचे जीवन एलियन्समुळेच नष्ट

वॉशिंग्टन : आपले ब्रह्मांड असंख्य रहस्यांनी भरलेले आहे. यातील काहीच रहस्ये उलगडण्यास शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आपल्या सूर्यमालेतील एक महत्त्वाचा खगोलीय पिंड मंगळ या ग्रहाबाबतही शास्त्रज्ञ गेल्या कित्येक वर्षांपासून अभ्यास करत आहेत. यातून ते मंगळावर कधीकाळी लोक राहत होते का? जर ते होते तर ते कसे राहत होते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतात.

मंगळावरही कधी काळी पृथ्वीप्रमाणेच जीवन अस्तित्वात होते; पण ते हळूहळू नष्ट होत गेले. यासंदर्भात यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, एलियन्समुळेच लालग्रहावरील जीवन नष्ट झाले आणि ते सध्या उजाड बनले आहे. ‘नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावरील वातावरण पृथ्वीप्रमाणेच होते. मात्र, एलियन्समुळे तेथील जल-वायूत बदल होत गेला आणि जीवन संपुष्टात आले.

दरम्यान, नव्या संशोधनात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, मंगळावरील जल-वायू परिवर्तन करून एलियन्सनी स्वतःचेच अस्तित्व नष्ट करून टाकले. संशोधनात असेही नमूद करण्यात आले की, पृथ्वीवर जीवन अस्तित्वात येणे आणि मंगळावरील जीवन नष्ट होणे हे या दोन्ही ग्रहांवरील वायूंची संरचना तसेच सूर्यपासूनचे अंतर जबाबदार आहे. मात्र, जल-वायू परिवर्तनामुळे मंगळावरील तापमान इतके खाली घसरले की, त्यामुळे हा लालग्रह उजाड बनला.

Back to top button