अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ तील काही सीनवर सेन्सॉर बोर्डची कात्री | पुढारी

अक्षय कुमारच्या 'राम सेतू' तील काही सीनवर सेन्सॉर बोर्डची कात्री

पुढारी ऑनलाईन डेस्क :  नुकताच ‘राम सेतू’ चित्रपटाचा टेलर रिलीज झाल्याने अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अक्षयचा यावर्षीचा हा पाचवा प्रोजेक्ट आहे. परंतु राम सेतु मधील काही सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला असून काही डॉयलॉग्सवर कात्री चालवली आहे.

राम सेतूमधील डॉयलॉग्समध्ये होणार बदल

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून राम सेतू चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. परंतु काही डॉयलॉगवर आक्षेप नोंदवत त्यामध्ये बदल करूनच फिल्म रिलीज करण्यात येणार असल्याचे सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.

राम सेतुमधील या डॉयलॉग्सला लावली कात्री

राम सेतु या चित्रपटाची कथा जरी भगवान श्रीरामांच्या सैन्यांनी बांधलेल्या रामसेतूवर आधारित असली तरी त्या कथेला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे . दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला ‘राम सेतू’ चित्रपट रिलीज होणार आहे.

    हेही वाचलंत का ?

 

 

 

 

 

 

 

Back to top button