बिग बॉस मराठी ४ डे १८ : तेजस्विनी, अमृता, अपूर्वा आणि समृद्धी यांच्यामध्ये पेटणार शाब्दिक युद्ध | पुढारी

बिग बॉस मराठी ४ डे १८ : तेजस्विनी, अमृता, अपूर्वा आणि समृद्धी यांच्यामध्ये पेटणार शाब्दिक युद्ध

पुढारी ऑनलाईन : कोर्टाची पायरी चढू नये पण बिग बॉसच्या घरात कोर्टाची पायरी चढल्याशिवाय शहाणपण येत नाही. बिग बॉसचे हे घर म्हणजे, आरोप – प्रत्यारोप यांची शर्यत आहे, पण असे असून देखील काही सदस्य आपली स्पष्ट आणि रोख ठोक मतं मांडत नाहीत, आपली ठाम भूमिका मांडताना दिसत नाहीत. पण घराचा कॅप्टन होण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते. उत्तम निर्णय क्षमता, ठाम मतं असणे, स्वतः च्या मतावर ठाम उभे राहणे, चर्चेत राहणे आणि घरावर वर्चस्व असणे महत्वाचे आहे. आणि म्हणूनच बिग बॉस यांनी सदस्यांवर काल रोख ठोक हे कार्य सोपवले. काल कॅप्टन्सीचे चार उमेदवार मिळाले असून तेजस्विनी, अमृता धोंगडे, अपूर्वा आणि समृद्धी आणि यांच्यामध्ये पेटणार शाब्दिक युद्ध.

यात तेजस्विनी करणार आहे समृद्धीवर आरोप, तिचे म्हणणे आहे की, एक बॅगचा टास्क झाला होता. ज्यामध्ये अर्थातच त्या एका टीमसाठी खेळत होत्या. तेव्हा मी त्यांच्यासोबत डील करत होते. त्यांचा मुद्दा असा होता कि, मला फरक पडत नाही मी एकदा कॅप्टन बनले आहे. मला असं वाटतं जर फरक नाही पडत तर मग योग्य उमेदवाराला खेळू द्या.

यावर समृद्धी स्पष्टीकरण देताना म्हणाली की, कॅप्टन असल्याने असं नाहीये कि मला फक्त स्वतःचं बघायचे आहे. मला माझ्या टीमचे देखील बघायचे आहे. ग्रुपच्या मेंबर्सची मत लक्षात घेऊन त्यांच्यासाठी निर्णय घेणं तिथे आवश्यक वाटते. तेजस्विनीचे म्हणणे आहे की, तुमचे ग्रुप मेंबर्स ठरवूनच ठेवले आहेत. यानंतर दोघी आपली बाजू मांडत होत्या. यामुळे चीहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button