भारतीय जवान कारवाई: पाकिस्तान सीमेवरून आलेले ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले, सीमेवर शोधमोहीम सुरू | पुढारी

भारतीय जवान कारवाई: पाकिस्तान सीमेवरून आलेले ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले, सीमेवर शोधमोहीम सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पाकिस्तानच्या सीमेवरून भारतीय हद्दीत आलेला ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले आहे. पंजाबमधील गुरुदासपूर सेक्टरमध्ये पहाटे ४.३५ वाजता भारतीय बीएसएफ जवानांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर भारत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

बीएसएफच्या जवानांना पाकिस्तानकडून ड्रोन येण्याचा आवाज आला. हे ड्रोन भारतात प्रवेश करताच जवानांनी त्यावर १७ राऊंड गोळ्या झाडल्या. यामध्ये ड्रोनच्या एका ब्लेडचे नुकसान झाले आहे. यानंतर भारतीय जवानांकडून संपूर्ण परिसराचा शोध सुरू आहे. लवकरच ड्रोनचे विश्लेषण केले जाईल असे  बीएसएफचे डीआयजी प्रभाकर जोशी यांनी सांगितले आहे.

Back to top button