China imposes lockdowns | चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन! ओमायक्रॉनच्या २ धोकादायक व्हेरियंटचा शिरकाव | पुढारी

China imposes lockdowns | चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन! ओमायक्रॉनच्या २ धोकादायक व्हेरियंटचा शिरकाव

शांघाय : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. येथे कोरोनाच्या ओमायक्रॉनचे दोन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. बीएफ.७ (BF.7) आणि बीए.५.१.७ (BA.5.1.7) अशी त्यांची नावे आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये लॉकडाऊन (China imposes lockdowns) आणि प्रवासांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. BF.7 (ज्याला BA.2.75.2 असेही म्हणतात) हा Covid Omicron BA.5.2.1 च्या जातकुळीतला आहे. स्थानिक अहवालानुसार, BF.7 हा व्हेरियंट ४ ऑक्टोबर रोजी यंताई आणि शाओगुआन शहरात आढळून आला आहे. BA.5.1.7 हा सबव्हेरियंट पहिल्यांदाच चीनमध्ये आढळून आल्याचे ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) BF.7 हा अत्यंत संसर्गजन्य असल्याने खबरदारीचा इशारा दिला आहे. दरम्यान, चीनमधील गोल्डन वीकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणे लोकांना शक्य झालेले नाही. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शांघायच्या डाउनटाउन पैकी तीन जिल्ह्यांनी सोमवारी इंटरनेट कॅफे तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

चीनमध्ये १० ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या २,०८९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. शांघायमध्ये नवीन ३४ रुग्ण आढळ‍ून आले आहेत. हे सर्व रूग्ण इतर प्रांतातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. क्वारंटाइनमध्ये असताना त्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती शांघाय आरोग्य आयोगाने दिली आहे.

रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शांघायसह अन्य मोठ्या शहरात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनांनी शाळा, मनोरंजन आणि पर्यटने स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (China imposes lockdowns)

हे ही वाचा :

Back to top button