राजधानी दिल्‍लीत खादी विक्रीचा विक्रम; गांधी जंयतीदिनी १.३४ कोटींची विक्री | पुढारी

राजधानी दिल्‍लीत खादी विक्रीचा विक्रम; गांधी जंयतीदिनी १.३४ कोटींची विक्री

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीच्या मध्यभागी स्थित कॅनॉट प्लेस परिसरात असलेल्या खादी इंडियाच्या केंद्रातून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) कोट्यवधींची खादी विक्री केली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला या केंद्रातून विक्रमी १.३४ कोटींची खादी विक्री झाल्याची माहिती सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) दिली आहे. यापूर्वी देखील या केंद्रातून एकाच दिवशी १ कोटींहून अधिक खादी विक्री झाली आहे.

विक्री केंद्राने २ ऑक्टोबर २०२१ मध्ये १.०१ कोटी रुपयांची विक्री केली होती. यापूर्वी खादीची एका दिवसातील सर्वाधिक विक्री ३० ऑक्टोबर २०२१ रोजी १.२९ कोटी रुपये एवढी होती. यंदा मात्र या केंद्रावरील खादी विक्रीने सर्व विक्रम मोडले आहेत. केवळ राजकीय नाही तर आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कारणांसाठी गांधीजींनी खादी चळवळ उभारली होती. महात्मा गांधी यांचा हाच दृष्टीकोन पुढे नेत पंतप्रधानांनी खादी आणि अन्य ग्रामोद्योग उत्पादनांचा जनतेमध्ये प्रचार करण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button