Nobel Prize : स्वीडनच्या स्वंते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील संशोधनासाठी नोबेल जाहीर! | पुढारी

Nobel Prize : स्वीडनच्या स्वंते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील संशोधनासाठी नोबेल जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे. स्वंते पाबो यांना 2022 (Nobel Prizes 2022) वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (Physiology or Medicine Nobel Prize) प्रदान करण्यात आले आहे. विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पाबो हे पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत, ज्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथे मेंजेनेटिक्स विभागाचे संचालकही राहिले आहेत.

स्टॉकहोम येथील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या पॅनेलने आज (दि. 3) नोबेल पुरस्कार जाहीर केला. संस्थेच्या म्हणण्यानुसार, पाबो एक आनुवंशिकशास्त्रज्ञ आहे, जे उत्क्रांतीविषयक अनुवांशिक क्षेत्रातील तज्ञ आहे. त्यांनी निएंडरथल जीनोमवर बरेच काम केले. त्यांनी निअँडरथल जीनोमचे अनुक्रम करून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. निअँडरथल्स हे मानवी होमो वंशाचे नामशेष झालेले सदस्य आहेत. या आदिम मानवाचे अवशेष जर्मनीतील निअँडर नावाच्या दरीत सापडले, त्यामुळे त्यांना निएंडरथल हे नाव पडले.

गेल्या वर्षी, 2021 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना देणा-या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. हे दोन्ही नोबेल विजेते अमेरिकन आहेत. डेव्हिड ज्युलियन हे कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. पाटापूटियन हा अर्मेनियन वंशाचा अमेरिकन नागरिक आणि ला जोला येथील स्क्रिप्स इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ आहे.

Back to top button