Delhi Crime | दिल्ली पुन्हा हादरली! लैंगिक अत्याचार आणि रॉडच्या मारहाणीत १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू | पुढारी

Delhi Crime | दिल्ली पुन्हा हादरली! लैंगिक अत्याचार आणि रॉडच्या मारहाणीत १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : दिल्ली पुन्हा एकदा एका विचित्र घटनेने हादरली आहे. एका १० वर्षाच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी मारहाण आणि लैंगिक अत्याचार केले होते. ही घटना १८ सप्टेंबर रोजी उत्तर-पूर्व दिल्ली भागातील सीलमपूर येथे घडली होती. दरम्यान, गंभीर स्वरुपाच्या दुखापतीमुळे सदर १० वर्षाच्या पीडित मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यात पीडित मुलाच्या चुलत भावाचा समावेश आहे. अद्याप तिसरा मुलगा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे वय अवघे १० वर्षे आहे. तर त्याच्यावर अत्याचार करणारी मुलेही १० ते १२ वयोगटातील आहेत. १० वर्षाच्या मुलाला तीन मुलांनी रॉड, काठ्यांनी मारहाण केली होती आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला होता. सदर मुलाला उपचारासाठी लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबर रोजी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

यानंतर पोलिसांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन पीडित मुलाच्या आई-वडिलांकडून घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला मुलांच्या कुटुंबियांनी काहीही सांगण्यास नकार दिला होता. २४ सप्टेंबर पर्यंत कुटुंबियांनी कोणतीही माहिती दिली नाही. ही घटना घडल्यानंतर कुटुंबीयांनी पीडित मुलाला चार दिवस रुग्णालयात उपचारास आणले नाही. यामुळे त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अखेर पोलिसांनी समुपदेशन करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर पी़डित मुलाच्या आईने शेवटी खुलासा केला की तीन मुलांनी तिच्या मुलावर शारीरिक अत्याचार केले होते. कर्जामुळे त्यांच्या कुटुंबाला वेळेवर पैशांची परतफेड करणे अशक्य झाले होते. या प्रकरणी आयपीसीमधील कलम ३७७ आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याआधी एकाला ताब्यात बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर केले होते. दिल्ली महिला आयोगानेदेखील या प्रकरणी पोलिसांना नोटीस जारी करुन संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

तीन मुलांनी आपल्या मुलाला विटा आणि रॉडने मारहाण केल्याचे आईने म्हटले होते. १० वर्षाच्या मुलावर हल्ला करणाऱ्या दोन मुलांना पकडून बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर करण्यात आले आहे, तर पोलिस अजूनही तिसऱ्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

चुलत भावासह पीडितेवर हल्ला करणाऱ्या दोन मुलांना पकडून बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे, तर पोलिस अजूनही तिसऱ्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीलमपूर येथील झोपडपट्टीत राहणारा १० वर्षांचा मुलगा १८ सप्टेंबर रोजी एका रिकाम्या दवाखान्यात तीन मित्रांसोबत खेळत होता. तेव्हा तीन मुलांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण केली. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की मृत मुलगा आणि संशयित तीन मुले हे नवीन सीलमपूर झुग्गी येथील रहिवासी असून ते एकमेकांचे शेजारी आहेत.

हे ही वाचा :

Back to top button