Ashwini Mahangade : राणू आक्का खूपच भारी😍; हिरव्या साडीत अश्विनीचा मराठमोळा लूक | पुढारी

Ashwini Mahangade : राणू आक्का खूपच भारी😍; हिरव्या साडीत अश्विनीचा मराठमोळा लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते” फेम मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ( Ashwini Mahangade ) चाहत्याच्या घराघरांत पोहोचली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत तिची ‘राणू अक्का’ आणि आई कुठे काय करते मालिकेत ‘अनघा’ ची भूमिका खूपच गाजतेय. याच दरम्यान अश्विनीनं नवरात्री उत्सव माता दुर्गाचे दर्शन घेत मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. यावेळी तिच्या नवनवीन साडीतील मराठमोळा लूक चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.

सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सामान्यापासून ते मराठी कलाकारदेखील यामध्ये मागे राहिलेले नाहीत. काही मराठी कलाकारांनी भेट दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर काहींनी नवरात्रीत नवरंगाचे कपडे परिधान करून चारचॉंद लावले आहेत. याच दरम्यान छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते मालिकेत ‘अनघा’ नेही मराठमोळ्या लूकमध्ये ग्लॅमरस दिसली.

अनघा म्हणजे, मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने ( Ashwini Mahangade ) नवरात्रीत काही साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने नवरात्रीच्या प्रत्येक दिवसांत वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या आहे. नवरात्रीत पहिल्या दिवशी व्हाईट, दुसऱ्या दिवशी रेड , तिसऱ्या दिवशी ब्ल्यू, चौथ्या दिवशी यलो आणि पाचव्या दिवशी ग्रीन रंगाच्या साडीत ती एकदम हटके दिसली. केसांची स्टाईल, नाकात नथ, भरजरी दागिने, कानात वेगवेगळ्या रंगाचे झुमके आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. यावेळी प्रत्येक फोटोत आश्विनीची नजाकत पाहायला मिळाली.

यासोबत तिने शेअर केलेल्या फोटोतून नवरात्रीतील पाच रंगाचे महत्व सांगितले आहे. ग्रीन रंगाच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘हिरवा रंग म्हणजे, निसर्गाचा रंग हा प्रगती, भरभराट, समृद्धी, सुसंवाद, स्थिरता, संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे.’ असे लिहून महत्व सांगितले आहे.

‘Nice pic❤️❤️❤️’, ‘Wow💚💚’, ‘Khup chan’, ‘Love u 🥰’, ‘Mast distes tai😍’, ‘Nice 👍’, ‘किती गोड ताई ❤️’, ‘B❤️ beautiful 😍😍’, ‘लय भारी लुक मॅडम जी 👌👌’, ‘खुप सुंदर ❤️❤️❤️❤️🔥🔥so 😍😍beauteful’, ‘Kamaaaal alay ha photo😍😍’, ‘sundar ❤️❤️❤️’, ‘Nice smile’, ‘राणू आक्का खूपच भारी😍’, ‘Great 🔥❤️😍’, ‘❤️🙌🔥😍 looking so pretty 🤩’, ‘Khupach chhan 👌’, ‘Natural Beauty 🤎🍫’, ‘🌹Wooow….kiti sundar💌🌼🌼’. या कॉमेन्टससोबत चाहत्यांनी तिला नवरात्रीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. आश्विनीच्या ग्रीन रंगाच्या साडीवर आतापर्यत जवळपास अडीच हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by RAVI PAWAR (@ravi_pawar_photography)

Back to top button