पुणे : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू | पुढारी

पुणे : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर होईल, तर पहिली गुणवत्ता यादी 12 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यंदा प्रवेशाचे दोन ऐवजी तीन कॅप फेरी होणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या संस्थांमधील 1 लाखांहून अधिक जागा आहेत. या जागांवर एमएचटी सीईटीत असलेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. सीईटी सेलने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावर्षी 798 स्वीकृती केंद्र (एफसी) केंद्राची निर्मिती केली आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया व प्रवेशाची माहिती स्वीकृती केंद्र (एफसी) सेंटरवर मिळणार आहे. अर्ज नोंदणी कालावधीत एफसी केंद्रांवर कागदपत्रांची तपासणी 4 ऑक्टोबरपर्यंत होईल. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीत हरकती व तक्रारींचा विचार करून पहिली गुणवत्ता यादी 12 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल, अशी माहिती वेळापत्रकात सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यातील शासकीय, अनुदानित, खासगी संस्थांच्या महाविद्यालयांतील जागांवर हे प्रवेश होणार आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून हे प्रवेश दिले जाणार आहेत. गेली दोन वर्ष कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचा कालावधी अपुरा मिळाला होता. यामुळे प्रवेश फेर्‍यात कपात करण्यात आली होती. यंदा मात्र दोन ऐवजी प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेत पसंतीच्या पहिल्या महाविद्यालयाचा पर्याय सक्तीचा असणार आहे.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज भरणे : 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर कागदपत्रे तपासणी व अर्ज कन्फर्म करणे : 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर तात्पुरती गुणवत्ता यादी : 7 ऑक्टोबर यादीवर हरकती घेण्यासाठीचा कालावधी : 1 ते 10 ऑक्टोबर पहिली गुणवत्ता यादी : 12 ऑक्टोबर पसंतीक्रम भरणे : 13 ते 15 ऑक्टोबर गुणवत्ता यादीनुसार जागांचे वाटप : 18 ऑक्टोबर संस्थात जाऊन प्रवेश घेणे : 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पहिल्या यादीनंतर रिक्त जागांची माहिती : 22 ऑक्टोबर दुसर्‍या यादीसाठी पसंतीक्रम भरणे : 23 ते 26 ऑक्टोबर दुसरी प्रवेश यादी जाहीर : 28 ऑक्टोबर दुसर्‍या यादीतील प्रवेश घेण्याची मुदत : 29 ते 31 ऑक्टोबर दुसर्‍या यादीनंतर रिक्त जागांची माहिती : 1 नोव्हेंबर तिसर्‍या यादीसाठी पसंतीक्रम भरणे : 2 ते 4 नोव्हेंबर तिसरी प्रवेश यादी जाहीर : 6 नोव्हेंबर तिसर्‍या यादीतील प्रवेश घेण्याची मुदत : 7 ते 11 नोव्हेंबर
अभियांत्रिकी वर्ग सुरू : 1 नोव्हेंबर

Back to top button