सांगली जिल्हा अद्याप पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

सांगली जिल्हा अद्याप पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत पावसाळ्याच्या काळात (जून वगळता)सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात 16 सप्टेंबरपर्यंत 1929.6 एवढा पाऊस पडला. या जिल्ह्यात 16 सप्टेंबरपर्यंत पावसाची सरासरी 1619.4 एवढी आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा 19 टक्के पाऊस जास्त झाल्याचे दिसून आले.

सातारा जिल्ह्यात 16 सप्टेंबरपर्यंत सरासरी 758.6 मि.मी. एवढा पाऊस पडत असतो. मात्र, याच कालावधीत जिल्ह्यात 1041.6 मि.मी. पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 37 टक्के अधिक आहे. सांगली जिल्ह्यात यंदाही मागील वर्षाप्रमाणेच कमी पाऊस पडला आहे. या वर्षी 16 सप्टेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यात 374.5 मि.मी. एवढा पाऊस पडला आहे. याच कालावधीची पावसाची सरासरी 408 मि.मी. एवढी आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा 8 टक्के कमी पाऊस झाला आहे.

मागील वर्षी जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 1037.5 मि.मी. एवढा पाऊस पडला आहे.वास्तविक 30 सप्टेंबरला या जिल्ह्याची सरासरी 886.2 मि.मी. एवढी आहे. मात्र, सरासरीपेक्षा 17 टक्के पाऊस जास्त पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत 2039.7 मि.मी. एवढा पाऊस पडला. या जिल्ह्याची सरासरी 1733.1 एवढी आहे. सरासरीपेक्षा 18 टक्क्यांनी पाऊस जास्त आहे. या उलट सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 451.5 मि.मी. एवढा पाऊस आतापर्यंत पडला आहे. अर्थात या जिल्ह्याची सरासरी 30 सप्टेंबरपर्यंतच पावसाची सरासरी 514.5 अशी आहे. सरासरीपेक्षा 12 टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे.

Back to top button