Madhuri Dixit : सूरज हुआ मध्यम 🧡म्हणत धक-धक गर्ल किती मनमोहक | पुढारी

Madhuri Dixit : सूरज हुआ मध्यम 🧡म्हणत धक-धक गर्ल किती मनमोहक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनमोहक हास्य, आरसपानी सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याची सम्राज्ञी माधुरी दीक्षितची जादू आजही कायम आहे. माधुरीही (Madhuri Dixit ) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. सध्या तिने नवे- नवे फोटो सोशल मीडियात शेअर करून चाहत्यांना भूरळ घातलीय.

धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर नारंगी रंगाच्या लेंहग्यासोबत प्लाझो पँटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या क्लासी लूकमध्ये माधुरी पहिल्यापेक्षा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. मोकळे केस, मेकअप, खुर्चीवर बसलेली पोझ, चेहऱ्यावर तेच आणि किलर हसू या सर्वानी तिचे सौदर्य खुलून दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Suraj hua madham 🧡’ असे लिहिले आहे. माधुरीच्या सौदर्यांचे कोतुक करताना चाहते थकत नाहीत. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

धक-धक गर्लचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सदेखील भरभरून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. माधुरीच्या या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनने ‘Love love love 😍😍😍😍’ असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यानी ‘Absolutely you so beautiful and gorgeous as always 😍😍’, ‘बेगम परत आलीय 😭’, ‘Kya khoob banaya Kudrat ne aapko….❤️❤️😍😍😍’, ‘Kitni khubsurat😇🧡🧡’, ‘Gorgeous ✨❤️’, ‘Chand dhalne laga 😍😍😍’, ‘Beautiful Mam lOOk Princess 💗😍’, ‘❤️❤️waaooo❤️❤️’, ‘So pretty ❤️❤️’, ‘❤So sweet nice and beautiful’, ‘Hayeeeee MashaAllah ♥️ my girl is looking so beautiful ❤️❤️ evil eyes off 😍 you are fire 🔥’, ‘Still gorgeous 🥰’, ‘Osm🔥’, ‘Nice 😀’, ‘जादू ये चल गया तो मेरा कसूर क्या है..!!’. यासारख्या कॉमेन्टचा पाऊस पडत आहे. तर काही चाहत्यांनी ह्रार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

माधुरीचा ‘मजा मा’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटातील एक गाणेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तर ती ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये देखील दिसणार आहे. माधुरीने ‘द फेम गेम’ चित्रपटातून पहिल्यांदा डेब्यू केला आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

Back to top button