Apdi-Thapdi film : 'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकर येतोय 'आपडी थापडी'चा खेळ खेळायला | पुढारी

Apdi-Thapdi film : 'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकर येतोय 'आपडी थापडी'चा खेळ खेळायला

पुढारी ऑनलाईन डेस्क : “पैचान कौन”? (Apdi-Thapdi film) या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे येत आहे. “आपडी थापडी” या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. नवीन प्रभाकरसह श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. (Apdi-Thapdi film)

सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे.

“आपडी-थापडी” चित्रपटात युवराज भोसले ही भूमिका नवीननं साकारली आहे. नवीन भूमिका कशी आहे, चित्रपट कसा आहे अशा प्रश्नांची उत्तरं आता चित्रपटगृहातच मिळतील. चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियातून जोरदार दाद मिळाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष चित्रपट पाहण्यासाठी ५ ऑक्टोबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Back to top button