स्पेनमध्ये नवीन वेश्याव्यवसाय विधेयकाविरूद्ध तीव्र निदर्शने | पुढारी

स्पेनमध्ये नवीन वेश्याव्यवसाय विधेयकाविरूद्ध तीव्र निदर्शने

पुढारी ऑनलाईन डेस्‍क  : स्पेनमधील सरकारने संसदेत नुकतेच वेश्याव्यवसायविरोधी एका विधेयक मंजूर केले आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी  माद्रिद येथील स्पेनच्या संसदेबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत.

या बिलात वेश्याव्यवसाय करणारे, क्लब मालकांना ४ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्‍यात आली आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित नागरिकांमध्ये या बिलाबद्दल तीव्र नाराजी व्‍यक्‍त हाेत आहे.

स्पेन हा देश युरोपमधील सर्वात प्रसिद्ध सेक्स टुरिझम स्पॉट म्हणून ओळखला जातो. या देशात पूर्वीपासूनच वेश्‍याव्यवसाय हा कायदेशीर असल्याचे मानले जायचे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात सेक्स वर्कर्स म्हणून दक्षिण अमेरिकन आणि स्पॅनिश महिला काम करतात; पण वेश्याव्यवसायाविरोधी नवीन विधेयकात ग्राहक आणि क्लब मालकांना आर्थिक दंड आणि कारावासाची शिक्षा नमूद केल्याने या व्यवसायाशी संबंधित नागरिकांमध्ये या बिलाचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

हेही वाचा:

 

 

Back to top button